Ladki Bahin Yojana 2024 : हवेली तालुक्यात पहिली लाभार्थी रक्कम शंभर कोटींपेक्षा अधिक मिळणार! हवेलीत ३ लाख ५३ हजार महिला लाभार्थी ठरणार…

Ladki Bahin Yojana 2024 उरुळीकांचन : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हवेली तालुक्यात तब्बल ३ लाख ५३ हजार इतके ऑनलाइन स्वरुपाचे अर्ज दाखल झाले असून अर्ज पडताळणी करुन ३ लाख २३ हजार इतके अर्ज वैध ठरले आहे.

या त्रुटी निघालेल्या साधारण ३० हजार लाभार्थी अर्जांत कागदपत्रांची पूर्तता नसणे व अर्जांतील अस्पष्टपणा या कारणाने त्रुटी राहिलेल्या अवैध अर्जांना नव्याने ऑनलाईनद्वारे भरण्याची मुभा देऊन अर्जांची नोंदणी प्रक्रिया चालू केली असून या योजनेतून एकट्या हवेली तालुक्यात या योजनेतून ३ लाख ५३ हजार लाभार्थी योजनेच्या प्रत्यक्ष लाभासाठी पात्र ठरतील अशी माहिती हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ३ ऑगस्ट पर्यंत हवेली तालुक्यातून ३ लाख ५३ हजार इतके अर्ज दाखल झाले आहेत. हवेली तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीसह ,पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील सामाविष्ठ गावे मिळून ३ लाख ५३ हजार इतके अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांच्या पडताळणीत ३० हजार अर्जांत त्रुटी आढळल्याने अवैध ठरले आहेत.या अर्जांत अर्ज स्कॅनिंग करुन अस्पष्ट दाखविणे, फोटोत सदोषता व अर्जात कागदञांची कमतरता अशा कारणांनी अवैध ठरवले आहे.

परंतु या अर्जदारांना संपर्क साधून नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा देऊन योजनेत पात्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार १०
ऑगस्ट पर्यंत जमा होणाऱ्या अर्जांना राज्य शासनाकडे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत पाठविण्यात येणार आहे. हवेली तालुक्यातून १० ऑगस्ट पर्यंत ३ लाख ५३ हजार इतक्या महिला लाभार्थी पात्र ठरु शकणार आहेत. त्यामुळे हवेली तालुक्यात १७ ऑगस्ट या योजनेचा प्रत्यक्ष लाभ बचत खात्यावर मिळणाऱ्या महिलांचा आकडा ३ लाख ५३ इतका मोठाअसणार आहे.
त्यामुळे प्रत्येकी३ हजार रुपये प्रति महिलेला बचत खात्यावर मिळणार असल्याचे गृहीत धरता हवेलीतून शंभर कोटींहून अधिक रक्कम एका तालुक्याला पात्र होणार आहे. तालुक्यातून ३ ऑगस्ट ते आजपर्यंत पडताळणी सुरू असून अपात्र अर्जाना नव्याने संधी दिली जात आहे.
‘हवेली तालुक्यात ३ जूनपासून ते ३ ऑगस्ट पर्यंत ३ लाख ५३ हजार इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.त्यापैकी ३० हजार अर्ज अवैद्य आहेत. या त्रुटी राहिलेल्या अर्जांची पडताळणी करुन नव्याने पुन्हा भरून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. दिवस – रात्र हे काम चालू असून साधारण अर्जांइतके लाभार्थी यादी १०ऑगस्ट तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पात्रतेसाठी जाणार आहे’.
भूषण जोशी, गटविकास अधिकारी, हवेली