Ladki Bahin Yojana 2024 : तिसरा हप्ता कधी येणार खात्यात? लाडक्या बहिणींची विचारणा, महत्वाची माहिती आली समोर…
Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र सराकरनं महिलांना आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी केली जातेय. राज्य सरकारनं आतापर्यंत एक कोटी ५९ लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये दिले आहेत.
मात्र अर्ज करण्यास विलंब झालेल्या महिला संभ्रमात आहेत. ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यांत अर्ज भरले होते, त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसेही लवकरच मिळणार आहेत. खुद्द महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी याविषयी माहिती दिली आहे.
रक्षाबंधनानंतर गणेश चतुर्थी झाली, गणपती बाप्पा विराजमान झाले आणि निघालेही. अनंत चतुर्दशी झाली… आता पुढच्या हफ्ता कधी येणार, याकडे सर्वसामान्य महिलांचे डोळे लागून राहिले आहे. Ladki Bahin Yojana 2024
यावर महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यांत अर्ज भरले होते, त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसेही लवकरच मिळणार आहेत.
ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्या महिलांनाच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची कठोर छाननी सुरु आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.