Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेवर हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय…
Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.
तसेच लाडकी बहीण योजना सरकारने लागू केल्यानंतर याला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. याप्रकरणी हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. योजनेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. १४ ऑगस्टला सरकारी तिजोरीतून योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Ladki Bahin Yojana 2024
दरम्यान, लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप करीत नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी वकील ओवैस पेचकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायलयाने याचिका फेटाळताना नोंदवले आहे. कर भरतो म्हणून सुविधा द्या, अशी मागणी करता येत नाही. ‘फी’आणि ‘कर’यात फरक आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारने बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे. त्याला आव्हान कसे देता येईल? असा सवाल याचिकाकर्त्यास न्यायालयाने केला.