Ladki Bahin Yojana 2024 : लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा! आणखी १६ लाख लाडक्या बहिणींना सरकारचं गिफ्ट, खात्यावर आले ३००० रुपये…
Ladki Bahin Yojana 2024 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पत्र महिलांच्या बँक खात्याता पैसे जमा केले जात आहेत. आतापर्यंत ८० लाख महिलांच्या बँक खात्यावर राज्य सरकारने ३००० रुपये पाठवले आहेत.
अशातच आता आणखी १६ लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी दिला आहे. तशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे दिली आहे. Ladki Bahin Yojana 2024
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात ३००० रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी ८० लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.
सद्यस्थितीत एकूण ९६ लाख ३५ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले आहे.