Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी माहिती…


Ladki Bahin Yojana 2024  : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेची घोषणा केली होती. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रक्षाबंधनानिमित्त महिलांना मोठी भेट देण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. रक्षाबंधनापूर्वी या योजनेचे पहिले दोन हप्ते डीबीटीद्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. Ladki Bahin Yojana 2024

मिळालेल्या माहितीनुसार, ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करता येणार आहेत. यानंतर दर महिन्याच्या १५ तारखेला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जातील.

दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा फायदा राज्यातील महिला घेताना दिसत आहेत. तुम्ही अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर मुदत संपलेली नाही.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. म्हणजेच दरवर्षी १८,००० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!