Ladki Bahin Yojana 2024 : निवडणूक संपताच लाडकी बहीण योजनेत मोठे बदल! आता ‘या’ महिलांना मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या…

Ladki Bahin Yojana 2024 : विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण ही योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या पैशांवरून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिल्यानं या योजनेवरून विधानसभा निवडणूक काळात वातावरण चांगलंच तापले होते.
त्यानंतर महायुतीचं सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.
दरम्यान, या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा १५०० रुपये दिले जात आहेत. आत्तापर्यंत या योजनेचे पाच हप्ते जमा झाले आहेत. मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैेसे कधी जमा होणार याची सर्व महिलांना प्रतीक्षा आहे.
अशातच आता ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्यावर आहे त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण लाडक्या बहीण योजनेत कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नसल्याचं सरकारने म्हंटल आहे. तसेच लाडक्या बहीण योजनेसाठी जे निकष आधीचे आहेत तेच निकष कायम राहणार आहेत. यासंदर्भांत सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.