Ladki Bahin Yojana 2024 : खूशखबर! घरबसल्या करा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया…

Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यभरात सध्या याच योजनेची चर्चा सुरु आहे. या योजनेची चर्चा होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. राज्य सरकार अडीच लाखांपेक्षा कमी वार्षित उत्पन्न करणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला आता १५०० रुपये मदत म्हणून देणार आहे. Ladki Bahin Yojana 2024
राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून ही आर्थिक मदत राज्यभरातील महिलांना करणार आहे. महिलांना या योजनेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, जसे की आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ. तुम्ही देखील अर्ज करणार असाल तर येथे संपूर्ण प्रक्रिया सहज समजून घ्या….
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईलद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे..
सर्व प्रथम, Google Play Store वर जा आणि ‘नारी शक्ती दूत’ ॲप शोधा आणि ते इंस्टाल करा. या ॲपद्वारे तुम्ही विविध योजनांसाठी अर्ज करू शकता. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा. लॉग इन करा तुमचा मोबाईल नंबर, OTP देऊन आणि अटी व शर्तींना सहमती देऊन ॲपवर लॉग इन करा.
तुमचे प्रोफाइल अपडेट करा तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका, आणि महिला शक्तीचा प्रकार (सामान्य महिला, बचत गटाच्या अध्यक्षा, गृहिणी, ग्रामसेवक) भरावयाचा आहे.
अँप ओपन झाल्यानंतर ‘नारी शक्ती दूत’ पर्यायावर क्लिक करा आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ पर्याय निवडा. यानंतर ॲपला लोकेशन परमिशन द्या. यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होईल. तुमच्या आधार कार्डावर असलेली योग्य माहिती भरा.
यामध्ये संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक, आणि तुम्ही इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तपशील भरा.
तुमची वैवाहिक स्थिती प्रविष्ट करा आणि लग्नापूर्वी महिलेचे पूर्ण नाव देखील सांगा. त्यांनतर खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC कोड, तसेच आधार कार्ड नंबर टाका. आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, पुष्टीकरण पत्र, बँक पासबुक इत्यादी अपलोड करा. त्यानंतर थेट फोटो घ्या आणि अपलोड करा.
“गॅरंटी डिस्क्लेमर स्वीकारा” वर क्लिक करा आणि अटी व शर्ती स्वीकारा. सर्वकाही पूर्ण झाल्यावर, फॉर्म सबमिट करा. सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासा, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. OTP एंटर करा. अशा प्रकारे, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण करू शकता.