Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसंदर्भात आणखी एक गुड न्यूज, आता योजनेचा लाभ घेणे झालं अजून सोप्प…
Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे.
या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महिलांची वाढती संख्या लक्षात घेऊन आता नागपूर विभागात सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू राहणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
तसेच १३ आणि १४ जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावर आहे.
योजनेचे कामकाज कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावरील कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी १३ आणि १४ जुलै रोजी सुरु राहणार आहेत. कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्यानं यामुळे नागपूर विभागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. adki Bahin Yojana 2024
अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना चांगलीच लोकप्रिय ठरली असून, या योजनेला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.