Ladki Bahin Yojana 2024 : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट, सप्टेंबरमध्ये नोंदणी केल्यास दोन महिन्याचा लाभ…
Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अजून देखील महिला योजनेसाठी नोंदणी करत आहेत. आता नोंदणी करणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार असून या मिळणारी रक्कम ही कमी मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.
या योजनेसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहे. मात्र १ सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली आहे.
योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरवात केली आहे. मात्र यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे. १ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. Ladki Bahin Yojana 2024
लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल. आतापर्यंत ७० ते ७५ टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहितीही मंत्री तटकरे यांनी दिली.