Ladka Bhau Yojana : लाडका भाऊ योजनेवरून ठाकरे गटाची शिंदे सरकारवर जोरदार टीका, म्हणाले, भीक नको, नोकऱ्या द्या…
Ladka Bhau Yojana : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. या योजनेनंतर लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. शिंदेंनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात चांगलंच वातावरण तापलंय.
विरोधकांनी या योजनेवरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं असून जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर आता विरोधकांनी या योजनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. लाडका भाऊ योजना म्हणजे तरुणांची फसवणूक असल्याचे विरोधक म्हणत आहेत.
देशात बेरोजगारीच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे, यासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. बेरोजगारीला कंटाळून देशात दर तासाला दोन आत्महत्या होत आहेत. नुकताच कर्नाटक सरकारने स्थानिकांना नोकऱ्या देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळाने सर्व खाजगी उद्योगांमध्ये ५० ते ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचे विधेयक मंजूर केले. कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हंटले आहे. Ladka Bhau Yojana
बाळासाहेबांनी ५० वर्षांपूर्वी रुजलेला विचार बाजूच्या कर्नाटकात बहरला. कर्नाटक सरकारने स्थानिकांच्या नोकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची महाराष्ट्रामध्ये पुनरावृत्ती होईल का? नोकऱ्यांसाठी महाराष्ट्र पेटून उठेल असे वातावरण झाले आहे.
सध्या महाराष्ट्राची लूटमार सुरु आहे. राज्यातील सर्व मोठे उद्योग आणि नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात आहेत, असा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.