महिलांनो मेंदी छान रंगण्यासाठी कोणते घरगुती फंडे वापरताल…?


उरुळीकांचन : नैसर्गिकरित्या मेंदी रंगण्यासाठी घरीच मेंदी भिजवणे उत्तम. मेंदी भिजवतानाच त्यात काही नैसर्गिक आणि घरी असणारी द्रव्यं मिसळली तर नक्कीच मेंदी छान रंगते.

बाजारातून मेंदीचा कोन विकत आणला की प्रत्येकीची मेंदी अवघ्या तासातही रंगते. अर्थात ही किमया असते ती मेंदीत ‘वापरलेल्या केमिकलची. या केमिकल्सचा काहींना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच नैसर्गिकरित्या मेंदी रंगण्यासाठी घरीच मेंदी भिजवणे उत्तम. मेंदी भिजवतानाच त्यात काही नैसर्गिक आणि घरी असणारी द्रव्यं मिसळली तर नक्कीच मेंदी छान रंगते. त्यासाठी हे करा.

बाजारातील हिरव्या रंगाची पाच टी-स्पून मेंदी पावडर मलमलच्या कापडातून दोन वेळा गाळून घ्यावी. एक कप पाण्यात १ टी-स्पून चहा पावडर, १ टी-स्पून कॉफी, २ ते ४ कुटलेल्या लवंगा घालून पाणी ‘उकळावे. वरील मिश्रण गार झाल्यावर गाळून घ्यावे. गाळलेल्या मिश्रणात १ लिंबू, १० ते १२ निलगिरीचे थेंब टाकावे. तयार झालेल्या मिश्रणात ५ टी-स्पून गाळलेली मेंदीपावडर मिसळावी व ती भरपूर फेटून घ्यावी.

मेंदी भिजवून २ ते ३ तास मग ती मेंदी कोनात भरावी. मेंदी काढण्यापूर्वीच डिझाईन ठरवून ठेवावे. मेंदी काढताना प्रथम आऊटलाईन काढून घ्यावी, नंतर त्यात बारीक नक्षी भरावी. मेंदी लावून झाल्यावर अर्धे लिंबू व चिमूटभर साखर यांचे मिश्रण कापसाच्या बोळ्याने हाताला लावावे. मेंदी लावल्यानंतर ५-६ तासांनी हाताला गोडेतेल लावावे. गरम तव्यावर लवंगा टाकून त्याच्या धुरावर मेंदी लावलेले हात धरावे व नंतर मेंदी खरवडून काढावी. मेंदी धुतल्यावर हाताला साबण किंवा शॅम्पू लावू नये.

आता घरगुती सौंदर्य सल्ला…

– दुखापतीचे व्रण किंवा भाजल्यानंतरचे काळे डाग घालविण्यासाठी पाण्यामध्ये चंदन पावडर मिसळून ती डागांवर लावा. यामुळे डाग फिकट होतात.
– चार बदाम सकाळी पाण्यात भिजवा. संध्याकाळी बदामाची साल काढून त्यामध्ये दोन चमचे दूध मिसळून त्याची पेस्ट करा. थोडं पाणी मिसळू शकता. रात्री झोपताना हा लेप चेहऱ्यावर लावून झोपा आणि सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवा. १५ दिवस सातत्याने प्रयोग केल्यानंतर चेहऱ्याचा रंग उजळेल आणि सावळेपणा दूर होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!