महिलांनो एकटीने प्रवास करताना या गोष्टी ठेवा लक्षात…!
उरुळीकांचन :आज बायका कामाच्या निमित्ताने किंवा अगदी सहजच ब्रेक हवा म्हणून एकट्या फिरायला किंवा प्रवासाला निघतात. आजही घरातील बाई किंवा मुलगी एकटी प्रवासाला निघाली की ती पुन्हा घरी सुखरूप येईपर्यंत घरच्यांना ही काळजी लागून राहतेच. पण म्हणून एकटीने मनसोक्त भटकंती करायची नाही का? तर असे अजिवात नाही. यासाठी काही महत्वाच्या बाबी त्यांनी लक्षात ठेवायला हव्यात.
● सार्वजिनक वाहने जसे की बसेस, रेल्वे, विमान यातूनच शक्यतोर प्रवास करावा. यामध्ये आजूबाजूला भरपूर माणसे असल्याने सुरक्षित वातावरणात तुम्ही प्रवास शकता.
● रात्रीचा प्रवास करावा लागणार असेल तर तुमच्याबरोबर कोणी स्त्री प्रवासी आहे का, ते अवश्य बघा आणि तिच्याशी ओळखही करून ठेवा.
● स्वत:जवळ नेहमी इमर्जन्सी नंबर ठेवा. त्या-त्या ठिकाणचे पोलीस, हॉस्पिटल, अग्निशामक दल असे नंबर कायम तुमच्या जवळ असू द्या.
● तुमच्या चेहऱ्यावर आणि एकूण हालचालीत आत्मविश्वास असायला हवा. तुमचे वावरणे जर आत्मविश्वासपूर्ण असेल तर त्याचा चांगला परिणाम समोरच्या व्यक्तीवर होतो.
● गॉगल, एम पी थ्री प्लेअर्स, आणि पुस्तके तुमचा प्रवास आनंददायी करतील.
● स्वतःचे ओळखपत्र, आणि काही आजार असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे स्वतःजवळ आठवणीने ठेवा.
● अनोळखी ठिकाणी फिरतांना, तुमचा पोशाख कसा असावा यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. साधे, सोपे आणि सुटसुटीत पोशाख निवडा.
आता पायांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स :
● पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल तेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून दोन वेळा चोळून लावा.
● आपल्या चपला, बूट नरम आणि आरामदायी घ्यावीत.
● पायाची फाटलेली त्वचा कात्रीने कापू नका, कात्री लागली असता इन्फेक्शन होऊ शकते.
● रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून त्यात १० मिनिटे पाय बुडवून ठेवा, याने पायाला आराम पडेल व झोप शांत लागेल.