महिलांनो पावसाळ्यात आपल्या सौंदर्याची कशी घ्याल काळजी..!

उरुळीकांचन : पावसाळ्याच्या दिवसांत नेमके कोणते कपडे घालावे आणि कोणता मेकअप करावा याबाबत फार संभ्रम असतो. तो संभ्रम दूर करण्याचा आणि नेमके कोणते कपडे घालावे आणि मेकअप कसा करावा याबाबत काही खास टिप्स.
पावसाळ्याच्या दिवसांत सुती, जॉर्जेट, शिफॉन, रेशमी वस्त्रे अजिबात घालू नयेत. कारण ही वस्त्रे उशिराने सुकतात व भिजल्यावर आकुंचित होऊन शरीराला चिकटूनही बसतात. रंग जाणारे कपडे तर अजिबात घालू नयेत.
– या दिवसात सिंथेटिक कपडेच सोयीस्कर ठरतात. ते भिजल्यानंतर लगेच सुकतात व ड्रेसला मॅचिंग असे नेलपॉलिश जरूर लावा.
– पावसाळ्याच्या आनंदी वातावरणात चटपटीत व स्मार्ट कलरचे कपडेच चांगले वाटतात. यासाठी मरून, जांभळा, निळा, हिरवा, गर्द पिवळा, ब्राउन मातकट व नारंगी रंगांची वस्त्रे सर्व वातावरणच रंगीत बनवून टाकतात.
– कपड्यांच्या निवडीबरोबरच बूट व चपला घालतानाही काळजी घ्या. खरे तर या दिवसात प्लॅस्टिक व रबरी बूट व चपला घालणेच श्रेयस्कर ठरते.
– या दिवसांत डार्क मेकअप करू नये. कारण पावसाच्या पाण्याने मेकअपचा नूर बिघडू शकतो व तुमचाही. अशा वेळी हलका मेकअप करणेच योग्य ठरते.
– चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे फाउंडेशन वा क्रीम लावू नये. केवळ हलकीशी फेस पावडर लावावी.
– गालांवर रूज अशी लावा की गालांना नैसर्गिक गुलाबी छटा प्राप्त होईल.
– या दिवसांत डार्क कलरची लिपस्टिक उठून दिसते.
– आयब्रोने आपल्या भुवया आकर्षक बनवा.
– या दिवसांत सर्वसामान्य केशरचना करणेच योग्य ठरते. नकली गंगावणे (स्विच) वापरणे वा केस कुरळे करणे टाळा. साधी वेणी व अंबाडा या दिवसांत ठीक राहते.
– या दिवसांत रात्री झोपण्यापूर्वी हात, पाय नीट धुऊन स्वच्छ ठेवावेत व त्यांना ग्लिसरीन लावावे.
– अंड्यातील पांढरा बलक घेऊन त्यात १ चमचा मध व लिंबूरस मिसळून फेटावे व आठवड्यातून एकदा चेहरा व मानेवर हे मिश्रण लावावे. २०-२५ मिनिटे झाल्यावर कोमट पाण्याने हे मिश्रण धुऊन टाकावे.