Kurla Bus Accident : कुर्लामध्ये भरधाव बसचा भयानक थरार! अपघात नेमका कसा झाला, खरी माहिती आली समोर…


Kurla Bus Accident : कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात बेस्ट उपक्रमाच्या बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली आहे.

भरधाव बेस्ट बसने रस्त्यावरील अनेकांना उडवलं आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कुर्ला येथील बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरे (54) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kurla Bus Accident

कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा 5 झाला आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय विष्णू गायकवाड(70), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(19), अनम शेख(20), कणीस फातिमा गुलाम कादरी(55), शिवम कश्यप(18) अशी मृतांची नावं आहेत. ज्यावेळी हा अपघात घडला, त्यावेळी अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

अपघात नेमका कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कुर्ला येथील आंबेडकर नगर परिसरात 332 क्रमांकाची बस कुर्ला वरुन अंधेरीकडे निघाली होती. रात्री डीसीपी झोन-5 गणेश गावडे यांनी सांगितलं की, 332 नंबरची बस कुर्ल्यात आल्यानंतर बेस्ट बसचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात घडला. बसचे नियंत्रण सुटल्यामुळे बेस्ट बसनं पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना चिरडलं आणि त्यानंतर थेट बस बुद्ध कॉलनी नावाच्या निवासी सोसायटीत घुसली आणि नंतर थांबली.

नेमकं कारण काय अपघाताचं?

या भीषण अपघातानंतर आमदार दिलीप लांडे यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनीच हा अपघात नेमका का झाला, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावेळी बोलताना आमदार लांडे म्हणाले की, “कुर्ला स्टेशनहून 332 क्रमांकाची एक बस निघाली होती.

ही बस प्रवाशांनी गच्च भरलेली होती. त्या बसचे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे चालक घाबरला होता. तो घाबरल्यामुळे त्याने ब्रेकवर पाय देण्याऐवजी एक्सलेटरवर पाय दिला. त्यामुळेच बस जास्त वेगात धावली. त्यामुळे कुर्ला स्टेशन ते आंबेडकर चौकापर्यंत बस सर्वांना चिरडत आली.

यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 26 जण जखमी आहेत. बाबा रुग्णालयात सर्वांवर उपचार करण्याची सोय नसल्यामुळे उर्वरित रुग्णांना सिटी हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, राजेवाडी हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे,” अशी माहिती आमदार लांडे यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group