Kunjirwadi : ‘कुंजीरवाडी’ च्या सरपंचपदी हरेश गोठे बिनविरोध, निवडणूक जमा-खर्च अभावी मावळत्या सरपंचांनी गमाविले पद..!!


Kunjirwadi उरुळी कांचन : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरेश शामराव गोठे हे बिनविरोध निवडून आले आहे. कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजु गायकवाड यांनी निवडणूकीचा जमा खर्च दाखल न केल्याने त्या अपात्र ठरल्यानंतर सोमवारी (ता. ८) पार पडली.

ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत हरेश गोठे यांचा एकमेव अर्ज आल्याने कवडे यांनी गोठे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे. Kunjirwadi

कुंजीरवाडीच्या तत्कालीन सरपंच अंजू गायकवाड यांनी निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाला निर्धारीत वेळेत सादर केला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. तसेच पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास तसेच ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.

या निवडणूक प्रक्रियेला कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, भाजपा हवेली तालुक्याचे उपाध्यक्ष सुभाष कुंजीर, गोरख घुले आदेश जाधव, माजी उपसरपंच भरत निगडे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल, सागर निगडे, बापूसाहेब घुले, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सचिन कुंजीर, गणेश कुंजीर, काळुराम कुंजीर, गजानन जगताप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत बोलताना नवनिर्वाचित सरपंच हरेश गोठे म्हणाले की, आगामी काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. गावातील गट-तट विसरून सर्व घटकांना भारतीय घटनेप्रमाणे समान न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!