कौतुकास्पद ! महावितरणची कुंजीरवाडी शाखा वीज बिल वसुलीत पुणे परिमंडळात पहिली, शाखेचा गौरव….!

उरुळी कांचन : जिल्ह्यातील कुंजीरवाडी शाखेने मार्च महिन्यात वसुलीच्या 113 टक्के महसूल वसूल गोळा केला आहे. यामुळे महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडळामध्ये दर्जेदार कामगिरी करत कुंजीरवाडी शाखेचा पहिला क्रमांक पटकवला आहे. याबाबत अभियंता हाजीमलंग बागवान यांचा मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
राजेंद्र पवार म्हणाले, यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे परिमंडलातील वीजहानी कमी करण्यासोबतच बिलांमधून पुणे परिमंडल थकबाकीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक महिन्यात अचूक बिलिंग, थकीत वीजबिलांची वसूली, महसूलवाढीच्या विविध उपाययोजना, वीजचोरीविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.
तसेच तत्पर ग्राहकसेवा या बाबींकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या बैठकीला पुणे परिमंडलातील उत्कृष्ट ग्राहकसेवा, महसूलवाढ व वसूली कार्यक्षमतेत गेल्या वर्षभरात सातत्याने सांघिकपणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयांतील अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह व सांघिक प्रमाणपत्र देऊन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रास्तापेठ येथे आयोजित वार्षिक आढावा बैठकीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या बैठकीला पुणे परिमंडलातील उत्कृष्ट ग्राहकसेवा, महसूलवाढ व वसूली कार्यक्षमतेत गेल्या वर्षभरात सातत्याने सांघिकपणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयांतील अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह व सांघिक प्रमाणपत्र देऊन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, प्रकाश राऊत, डॉ. सुरेश वानखेडे, सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत व ज्ञानदा निलेकर उपस्थित होते.