राज्यात कुणबी नोंदींची संख्या २९ लाखापर्यंत ! वंशावंळ जोडली तर मराठा समाजाला मोठ्या लाभाची शक्यता ..!!


मुंबई : मराठा आरक्षणाला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिल्यानंतर कुणबी नोंदी पुरावे शोधण्याचे काम झपाट्याने सुरू आहे. राज्यात पंधरा दिवसांत 29 लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला या नोंदीच्या आधारे भक्कम वंशावळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात तब्बल 29 लाख नोंदी आढळून आल्याने त्यांची वंशावळ पाहता, मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात दाखले मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने महसूल तसेच जिल्हा परिषदांच्या मराठी शाळा तसेच इतरही जातींच्या नोंदी असलेल्या ठिकाणी असलेले दाखले तपासण्याचे आदेश महसूल खात्याला तसेच शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार सर्वाधिक नोंदी विदर्भात आढळल्या आल्या आहेत.

 

विदर्भात तब्बल 13 लाख नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या आहेत. मराठवाड्यात मात्र तुलनेने अत्यंत कमी संख्या आहे. कोकणातही कुणबी नोंदी बोटावर मोजता येतील एवढ्याच सापडल्या असून पश्चिम महाराष्ट्रात मात्र ज्या नोंदी आढळले आहेत त्या सर्व नवीन आहेत.

 

दरम्यान ज्यांच्या नोंदी आढळल्या आहेत त्यांना तातडीने कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!