ब्रेकींग! कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात अवघ्या चार मतांनी कृषीराज उर्फ मनोज चौधरी विजयी….


उरुळी कांचन : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या २०२६ च्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. ९) जाहीर होताच कोरेगाव मूळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या सुरेखा हरगुडे तर कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातून कृषिराज उर्फ मनोज चौधरी बाजी मारली. तर केसनंद गणात भाजपचे कुशाल सातव यांचा विजय झाला आहे.

या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांचा सपशेल पराभव केला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत राष्ट्रवादीची आघाडी वाढत गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. निकाल जाहीर होताच जल्लोष साजरा करण्यात आला.

दरम्यान, केसनंद पंचायत समिती गणातून भाजपचे कुशाल सातव यांनी विजय मिळवत भाजपचे खाते उघडले. अटीतटीच्या लढतीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय खेचून आणला.

या निकालामुळे कोरेगाव मूळ परिसरात राष्ट्रवादीची ताकद अधिक भक्कम झाली असून स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकारास येत असल्याचे चित्र आहे. विकासाच्या मुद्द्यावर जनतेने राष्ट्रवादीला स्पष्ट कौल दिल्याचे दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!