हडपसर भागात कोयता गँगची दहशत; १० जणांकडून वाहनांची तोडफोड
पुणे: शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही. कोयत्या गॅंगने रात्री वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ९) हडपसर येथील वसंतददादा इन्स्टिट्यूट जवळून समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
या प्रकरणी नागरिकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ते १० जणांनी कोयत्या हातात घेऊन वाहनांची तोडफोड केली आहे. कोयत्या गॅंगमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून कोयत्या गॅंगने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी पोलिसांसमोर सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Views:
[jp_post_view]