पुण्यात कोयता गॅंग पुन्हा एकदा सक्रिय! आता क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना…
पुणे : गेल्या काही महिन्यापासून पुण्यात कोयता गॅंग सक्रिय झाली आहे. यामुळे पुण्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना आता क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनाही धमकावले आहे.
ही घटना बिबवेवाडीतील संत निरंकारी सत्संग भवनसमोर घडली आहे. हातात कोयते घेऊन ही गँग दुकानांमध्ये तोडफोड करायची. तसेच रात्री पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करायची.
या गँगने केलेल्या तोडफोडीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तब्बल 3,765 गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
दरम्यान, यासाठी पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या शक्कल लढवून देखील कोयता गँगला अजून आळा बसलेला नाही. यामुळे आता पुण्याचा बिहार होतोय का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Views:
[jp_post_view]