पुण्यात कोयता गॅंगचा राडा!! रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर वार करून केली दहशद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….

पुणे : पुणे शहरातील लोहगाव येथील साठे वस्ती परिसरात तरुणांनी कोयता आणि दगडांचा वापर करून वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या तरुणांनी गाड्या, दुकानं, तसेच रस्त्यावरील येणाऱ्या वाहनांवर कोयत्याने वार करत तोडफोड केली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या तोडफोडीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारे घटना घडत आहेत. व्हिडिओमध्ये देखील तरुण कोयता हातात घेऊन परिसरात उघडपणे दहशत निर्माण करत असल्याचे दिसत आहे.

पोलिसांकडून नागरिकांना शांत राहण्याचे आणि घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. याबाबत आरोपींचा शोध देखील घेतला जात आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर तरुण रोडवर येत हातात कोयता घेऊन गाड्यांचे नुकसान करत होते. अनेक ठिकाणी गाड्या देखील पेटवून देण्यात आल्या. यामुळे मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली आहे.
