कोथरूड प्रकरण ; मुलींना मारहाण करणं पोलिसांना भोवलं, कोर्टाकडून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश…


पुणे : पुण्यातील कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण पुणे पोलिसांना चांगलंच भोवलं असून कोर्टाकडून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता संबंधित पोलीसांवर गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास एक सीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूडमध्ये पोलिसांनी तीन मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून मुलींसोबत गैरव्यवहार केला होता, त्यांना मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. त्यानंतर मोठी आंदोलनं उभी राहिली. पोलिस आयुक्तालयात मुली आणि त्यांच्यासोबत अनेक जणांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन रात्रभर ठिय्या मांडला होता. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनीच या मुलींवर सरकारी कार्यात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला. त्यानंतर या मुलीनीं थेट पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती, याप्रकरणी अखेर कोथरुडच्या ‘त्या’ मुलींच्या लढ्याला यश मिळालं आहे. कोर्टाकडून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता संबंधित पोलीसांवर गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास एक सीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत

आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर दरोडा आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी आपली ओळख सांगितली नाही. त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावर अपमान केला, असं कोर्टानं म्हटलं आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा डागाळली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!