कोरेगाव मूळ येथील तरुणीच्या हत्या प्रकरण! आरोपीची उरुळी कांचन पोलिसांनी काढली धिंड, पोलीस म्हणतात…

उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्यानंतर परिसरात तणाव पसरला होता. या प्रकरणातील आरोपीला अटक झाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

तसेच पोलिसांनी आरोपीची थेट मुख्य बाजारपेठेतून धिंड काढली. तपासामध्ये पोलिसांना माहिती मिळाली की, कोरेगाव मूळ परिसरात २० वर्षीय तरुणी पायी जात असताना आरोपीने अचानक तरुणीला अडवून तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली होती.

दरम्यान, तरुणीने नकार दिल्यानंतर संतापलेल्या आरोपीने तिची निर्घृण हत्या केली. उरुळी कांचन पोलिसांनी सांगितले की, अशा कठोर कृतीमुळे गुन्हेगारी कृत्याला आळा बसतो.

ते पुढे म्हणाले की, गुन्हेगारांवर कठोर कारवाई केल्यानंतरच समाजात शांतता नांदेल. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या तत्पर आणि कठोर कारवाईमुळे स्थानिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
