कोरेगाव भीमा चौफुला रोडवरून रात्री कंपनीत जाणाऱ्या कामगारांचे हातपाय बांधून मारहान करून लुट…!
उरुळीकांचन : वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवरून रात्रीच्या सुमारास कंपनीत जाणाऱ्या कामगाराला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून दुचाकी मोबाईल सह आदी वस्तू लुटून अजूनही एका कामगाराला मारहाण करत लुटल्याची धक्कादाय घटना घडली आहे .
शिक्रापूर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवरून रात्रीच्या सुमारास संकल्प फिर्जींग कंपनीचा कामगार हरिष जगताप हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ एम एस ९७१५ या दुचाकीहून येत असताना 3 अज्ञात युवकांनी त्याला अडवून शिवीगाळ, दमदाटी करत शेजारील शेतात घेऊन जात त्याचे कपडे काढून त्याच्यात कपड्याने त्याचे हातपाय बांधून ठेवत त्याच्या जवळील मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड काढून घेत मोबाईल वरुन ऑनलाईन रक्कम पाठवण्याचा पासवर्ड विचारून रक्कम पाठवली. मात्र रक्कम सेंड न झाल्याने त्याच्या एटीएमचा पासवर्ड विचारून घेत त्याचीची दुचाकी घेऊन तिघेजण गेले.
दरम्यान , पुन्हा या इसमांनी त्या रस्त्याने येणाऱ्या वढू बुद्रुक येथील संकेत नामदेव भंडारी या युवकाला देखील मारहाण करत त्याच्याजवळील रक्कम व मोबाईल चोरुन नेला. मात्र हरिष जगताप या कामगाराला शेतातच दमदाटी करत हातपाय बांधून ठेवून तिघेजण निघून गेले. त्यावेळी हरिष याने स्वतःची सुटका करुन घेत जवळ असलेल्या एका घराकडे जात घडलेला प्रकार त्यांना सांगत पोलीस स्टेशन गाठले.