Kopardi Case : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेच्या मृत्यूची चौकशी करा, आईची हायकोर्टात याचिका दाखल..

Kopardi Case : कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्याच्या आईने केली आहे. याबाबत आईने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं येरवडा कारागृह प्रशासनास राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे या प्रकरणाची सध्या चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आरोपीची आई लता बाबूलाल शिंदे यांनी ही याचिका दाखल केली आहे. येरवडा कारागृहात असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कारागृहात पप्पूच्या झालेल्या अनैसर्गिक मृत्यूची आता न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
या मागणीत कारागृहात पप्पूला देण्यात येणाऱ्या औषधांचा तपशील कोर्टानं मागवून घ्यावा, असे म्हटले आहे. येरवडा कारागृहासह येरवडा पोलीस ठाणे, गृह विभाग व अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणी अहमदनगर विशेष न्यायालयानं पप्पू शिंदेसह अन्य आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती.
पप्पूनं एके दिवशी कारागृहात आत्महत्या केली. पप्पू हा मानसिक आजारानं त्रस्त होता. वकिलांना याबाबत वेळोवेळी पत्रही लिहिण्यात आलं होतं. Kopardi Case
त्यामुळे कारागृह प्रशासनाला याची पूर्ण माहिती होती. दोन वर्षे त्याला हा त्रास होत होता. कारागृहातील डॉक्टरांकडून त्याला काही औषधं सुरु होती, असेही याचिकेत नमूद करण्यात आलेले आहे. याची आता चौकशी होणार आहे.
दरम्यान, त्याने आत्महत्या केल्यानंतर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पोलीस प्रशासनावर देखील याबाबत संशय व्यक्त केला होता. यामुळे येणाऱ्या काळात काय माहिती पुढे येणार हे लवकरच समजेल.