Kolkata Doctor Death : कोलकत्ता अत्याचार प्रकरण वेगळ्या वळणावर, आता धक्कादायक माहिती आली पुढे…
Kolkata Doctor Death : कोलकाताच्या के आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. यावेळी, आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी डॉक्टर देबाशीष सोमच्या उपस्थितीवर एक मोठा दावा केला आहे.
अख्तर अली यांच्या माहितीनुसार, ८-९ ऑगस्टच्या रात्री महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या घडली असताना देबाशीष सोम घटनास्थळी उपस्थित होता. तथापि, देबाशीष सोम आरजी कर मेडिकल कॉलेजशी संबंधित नाही, असे अख्तर अली यांनी स्पष्ट केले.
देबाशीष सोम पश्चिम बंगालच्या आरोग्य भरती बोर्डाचे सदस्य आहेत, आणि त्यांचा पूर्वीच्या काळात आरजी कर मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाशी संबंध होता, असे अली यांनी सांगितले आहे. Kolkata Doctor Death
तसेच घटनेच्या रात्री ३६ तासांची शिफ्ट संपवून आराम करण्यासाठी महिला डॉक्टर सेमीनार हॉलमध्ये गेली होती. रात्री तीन ते चारच्या दरम्यान, तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. मृतदेह दुसऱ्या दिवशी आढळून आला. महिलांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.
संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून संजय रॉयच्या घटनास्थळी उपस्थितीचा पत्ता लागला. संजय रॉय २०१९ पासून कोलकाता पोलिसांसोबत नागरिक स्वंयसेवक म्हणून काम करत होता.