Kolkata Doctor Death : डॉक्टरवर अत्याचार करुन केली हत्या, आरोपी घरी जाऊन झोपला, पुरावे नष्ट करण्यासाठी कपडे धुतले पण एका चुकीमुळे अडकला…

Kolkata Doctor Death : पश्चिम बंगाल येथील कोलकाता सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर पूर्ण देश हादरला आहे. तसेच यापकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

तसेच अटक करण्यात आलेला आरोपी संजय रॉय याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. पोलिसांनी आता जी माहिती दिली त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. Kolkata Doctor Death
चौकशीदरम्यान आरोपीने माहिती दिली की, महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या केल्यानंतर तो घरी जाऊन शांत झोपला. मग, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याने सर्वप्रथम पुरावा नष्ट करण्यासाठी आपले कपडे धुतले.

पोलिसांच्या हाती लागला पुरावा…
गुन्हेगार याने त्याचा गुन्हा लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो काही ना काही असा पुरावा सोडतोच ज्याने तो पकडला जातो. संजय रॉयसोबतही तसंच घडलं. त्याने कपड्यांवरील रक्ताचे सर्व डाग धुतले, पण एका जागी डाग राहून गेला आणि तोच त्याला भारी पडला. पोलिसांना त्याच्या बुटांवर रक्ताच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी या खुणा पुरावा म्हणून जप्त केल्या आहे.
दरम्यान, संजय एक सिविक व्हॉलेंटिअर आहे, त्याला स्थानिक बोलीभाषेत सिव्हिल पोलीस देखील म्हणतात. शनिवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी पोलिसांनी त्याला अटक केली.
एक ब्लूटूथ इअरफोन त्याच्या अटकेसाठी प्रमुख पुरावा ठरला, हा ब्लूटूथ त्याच्या फोनला लगेच कनेक्ट झाला आणि रॉय पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या फोनमधून अनेक अश्लील व्हिडिओही सापडले आहेत.