कोल्हापूर हळहळलं! 20वर्षानं चिमुकली जन्माला आली अन् काळानं हिरावून नेली, उकळत्या दुधात पडून चिमुकलीचा मृत्यू


कोल्हापूर: कोल्हापूरच्या तेरवाड गावातील पाटील मळ्यामध्ये दोन वर्षीय चिमुकली उकळत्या दुधाच्या भांड्यामध्ये पडल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंचरी खोत (वय 2 वर्षे? असं मृत्यू झालेल्या चिमुरडीच नाव आहे.मंचरीची आई तिला जेवण भरवत असताना मंचरी तिच्या आईसोबत किचनमध्ये पाणी आणायला गेली होती. त्यावेळी उकळत्या दुधाच्या भांड्यामध्ये पडून ती होरपळली गेली.तिला तातडीने बाहेर काढले. मात्र तिला जास्त प्रमाणात भाजल्यामुळे त्या चिमुकल्या मुलीला तात्काळ जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यावेळी आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

शिरोळ तालुक्यातील तेरवाड गावचे ग्रामदैवत श्री मंगरायासिद्ध देवाची यात्रा होती. यात्रेसाठी तेरवाड येथील पाटील मळ्यात लाटवाडी येथील महिला आपल्या माहेरी यात्रेसाठी तिच्या दोन वर्षांच्या मुलीसोबत आली होती. मात्र यात्रेच्या तोंडावरच काळाने आईची चिमुरडी हिरावून नेली. या घटनेने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.

मंचुरी खोत आपल्या आई वडिलांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. तब्बल वीस वर्षानंतर ती या घरी जन्माला आली. मात्र उकळत्या दुधात पडून तिचा मृत्यू झाल्याने कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!