Kolhapur : कोल्हापूरमध्ये पुरग्रस्त भागात साथीच्या आजारांचा धोका वाढला, डेंग्यूचे रुग्ण वाढले…

Kolhapur : पावसाळा आला की साथीचे आजार पसरण्याचा धोका दरवर्षी निर्माण होतो. पूरग्रस्त भागातील दलदल, अनेक ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी, उद्याने आणि मोकळ्या जागांमध्ये साचलेले सांडपाणी यामुळे रोगराई पसरण्याचा मोठा धोका आहे.

पूरग्रस्त भागात महापालिकेने चिखल काढून तेथे पाणी आणि औषधाची फवारणी केली असली, तरी साचून राहिलेले पाणी आणि कचरा हा आजाराला निमंत्रण देऊ शकतो अशी स्थिती आहे.
तसेच त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता घटल्याने पोटविकारांसह अन्य आजारांचा धोका कायम आहे. डासांचा डंखही तीव्र झाला असून जिल्ह्यात जुलै महिन्यात ५८६ डेंग्यूचे, तर १०८ चिकुन गुनियाचे रुग्ण आढळले आहेत. हे प्रमाण पाहता येणाऱ्या काळात नागरिकांना सावध राहावे लागणार आहे. Kolhapur

दरम्यान, पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची मोठी भीती असते. दूषित पाणी पिल्याने जुलाब, उलटी, टायफॉईड, गॅस्ट्रोसारखे आजार होण्याची भीती असते. विशेषत: लहान मुले, गरोदर माता, वृद्धांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे येणारे काही दिवस पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.