Kolhapur News : पतीच्या निधनानंतर पत्नीला मिळाली अनुकंपावर नोकरी, ऑर्डर घेऊन परत घरी येत असताना घडली भयंकर घटना, क्षणात सगळं संपलं..


Kolhapur News : पतीच्या निधनानंतर अनुकंपाखाली नोकरी मिळाली आणि ऑर्डर घेऊन घरी येत असतानाच अपघात होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर केदारगावजवळ ही घटना घडली आहे.

जयश्री दीपक नाईक (वय. ४७, रा. शिरोली, ता. हातकणंगले) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.. दुचाकीस्वार नेताजी शिवाजी कांबळे (रा. पट्टणकोडोली ता. हातकणंगले) या अपघातात जखमी झाले आहेत. Kolhapur News 

मिळालेल्या माहिती नुसार, मृत जयश्री यांच्या पती पाटबंधारे विभागामध्ये नोकरीस होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी संघर्ष करून अनुकंपाखाली नोकरी मिळवली होती आणि त्या नोकरीच्या ऑर्डर आणण्यासाठी गेल्या होत्या. ती ऑर्डर ऊन येत असतानाच अपघात घडला.

केदारगावमधून कोल्हापूरकडे जाणाऱ्या टेम्पोने (बीडी-01-एफ-9258) दुचाकी (एमएच-09- डीयू 5619) धडक दिली. धडक दिल्याने जयश्री रस्त्यावर कोसळल्यानंतर त्यांच्या अंगावरून टेम्पो गेला. त्यामुळे त्या जागीच ठार झाल्या, तर दुचाकीस्वार नेताजी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!