Kolhapur Crime News : राज्यात नेमकं चाललंय काय? बदलापूरनंतर कोल्हापूरमध्ये भयंकर घटना! दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या..

Kolhapur Crime News : बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एका १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरमध्ये १० वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. बुधवारपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यानंतर गुरुवारी घराजवळच तिचा मृतदेह आढळला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Kolhapur Crime News
संबंधित मुलगी काल (ता .२१ ) दुपारपासून बेपत्ता होती. कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Views:
[jp_post_view]