Kolhapur Crime : आईचा संताप, मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके..


Kolhapur Crime : एखादी सावत्र आई एखाद्या मुलीसंदर्भात काय करु शकते? त्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंथरुणात लघुशंका केल्याच्या रागातून सावत्र आईनं 5 वर्षाच्या मुलीला उलथनं तापवत गुप्तांगासह गाल, ओठ आणि गळ्याजवळ चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोल्हापूर शहरातील हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे हा प्रकार घडला. हा प्रकार समजताच मुलीचे वडील शुभम मगरे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पूजा मगरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीमध्ये सावत्र आईनं पाच वर्षाच्या चिमुकलीला अंथरुणात ओलं केल्याच्या रागातून उलथन्यानं डाग दिले आहेत. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

शुभम मोकिंदराव मगरे हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसह आणि दोन मुलांसह कासारवाडी येथे भाडेकरू म्हणून राहतात. शुभम व पुजा यांचे दुसरे लग्न झाले असून दोघांनाही पहिल्या लग्नापासून आपत्य आहेत.

शुभम कामानिमित्त बाहेर गेले असता पुजा मगरे यांनी पाच वर्षाच्या मुलीला अंथरुणावर लघुशंका केली म्हणून उलथने तापवत चटके दिले आहेत. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं असून अंथरुण ओलं केल्याच्या रागातून मुलीला पोळवल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!