Kolhapur Accident : बोलेरो, ट्रकचा चक्काचूर, एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू, कोल्हापूरमध्ये भीषण अपघात….


Kolhapur Accident : राज्यात अलीकडे अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशातच आता राधानगरी तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात एकाच गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण सोळांकूर गावचे असून ऐन गणेशोत्सवात झालेल्या या अपघाताने गावात शोककळा पसरली आहे.

शुभम चंद्रकांत धावरे (वय. २८), आकाश आनंदा परीट (वय. २३) आणि रोहन संभाजी लोहार (वय.२४) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, बुधवारी (ता.११) सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ एका बुलेरो गाडीला ट्रकनं धडक दिली. या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार एकाच गावातील तिन्ही तरूण जागीच ठार झाले. Kolhapur Accident

तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीषण अपघातामुळं ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात ट्रक ड्रायव्हरनं भरधाव गाडी चालवत अपघात केला. अपघातानंतर अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता त्यानं घटनास्थळावरुन पळ काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!