कोकाटेंना वादग्रस्त वक्तव्य भोवणार ; कृषीखातं काढून घेतलं जाणार, कोण होणार नवे कृषीमंत्री?


पुणे : वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि विविध आरोपांमुळे चर्चेत असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसरे मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या खांद्यावर कृषीमंत्री पदाची धुरा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसापासून माणिकराव कोकाटे यांच्याविषयी असणारी नाराजी दिवसेंदिवस त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि आता विधानपरिषदेत रमी खेळणे या कारणामुळे वाढत चालली आहे.तसेच विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी कोकाटे यांच्या विरोधात अनेक आंदोलनही झाली. आता त्यांच्याकडे असणार कृषी खातं काढून घेतल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसरे मंत्री असलेले मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं आहे. पाटील यांच्याकडे कृषीमंत्रीपद सोपवल्यानंतर त्यांचं मदत आणि पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!