कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात ; युक्रेनच्या मंत्र्यासह 16 जणांचा मृत्यू…!


नवी दिल्ली : युक्रेनची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात युक्रेनच्या मंत्र्यासह 16 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. हेलिकॉप्टर कीवच्या बाहेरील लहान मुलांच्या शाळेत कोसळले. ही घटना कीवच्या ईशान्येकडील ब्रोव्हरी शहरात घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित लोक घटनास्थळी पोहोचले. या विमान अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अपघातानंतर मुलांची शाळा आगीच्या ज्वाळांनी वेढलेली दिसत आहे. आतापर्यंत अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.

युक्रेनचे राष्ट्रीय पोलिस प्रमुख इगोर क्लिमेंको यांनी सांगितले की, आतापर्यंत 16 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये युक्रेनच्या गृहमंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि गृहमंत्री डेनिस मोनास्ट्रिस्की आणि त्यांचे डेप्युटी येवगेनी येसेनिन यांचा समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!