पुण्याच्या जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदुपारी चौकात हत्या


पुणे : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झाला.

हल्लेखोरांनी भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरात हल्ला केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली. हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले. यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर त्याच ठिकाणी काही वेळ थांबून होते. आवारे हे रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते.

जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण काहीच वेळात त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!