Kirit Somaiya : ब्रेकिंग! किरीट सोमय्यांचा तो व्हिडिओ प्रसिद्ध करणे आले अंगलट, लोकशाही वृत्तवाहिनीवर मोठी कारवाई…
Kirit Somaiya मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. सोमय्या यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल लोकशाही वाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे. (Kirit Somaiya)
याबाबतची माहिती खुद्द लोकशाही वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. (Kirit Somaiya)
इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सुतार म्हणाले, किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वाहिनी आज संध्याकाळी ७ वाजेपासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेश वाहिनीला संध्याकाळी ६.१३ वाजता प्राप्त झाले. सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही, असही पोस्टमघ्ये म्हंटले आहे.
इन्स्टाग्रामवरील सुतार यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र त्यांच्या तोंडावर पांढरी पट्टी बांधण्यात आली आहे. लोकशाही चॅनलवर सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध कऱण्यात आला होता. सोमय्या महिलेशी फोनवर व्हिडीओ चॅट करत असल्याचे आरोपही त्यावेळी करण्यात आले होते.