शेतकरी पुत्राची कमाल! हवेलीतील हिंगणगावचा शेतकरी पुत्र किरण पोपळघट बनला DYSP…!

उरुळी कांचन : हिंगणगाव (हवेली) येथील किरण देविदास पोपळघट हा सध्या तरुणांसाठी आदर्श बनला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने २०२१ साली घेण्यात आलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेतून पोलीस उपअधीक्षक पदाला किरण पोपळघट यांनी ६७ रँक मिळवून या यशाला गवसणी घातली आहे.
याचमुळे त्याचे कौतुक केले जात आहे . परिस्थिती हलाखीची असताना त्याने यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
किरणचे वडील देविदास पोपळघट हे एक शेतकरी आहेत. तर त्यांची आई शशिकला एक गृहिणी आहेत. किरणचे प्राथमिक शिक्षण हिंगणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण अष्टापूर येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधून पूर्ण केले.
त्यानंतर त्याने कोथरूड येथील महाराष्ट्र ऑफ टेक्निकल इन्स्टिट्यूट अर्थात एमआयटीतून (MIT)डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर पुढे बॅचलर ऑफ इंजीनियरिंगचीची पदवी यांत्रिकी अभियंता यामधून साली पूर्ण केली. त्याने विद्यापीठाच्या कमवा व शिका या योजनेतून उदरनिर्वाह करून शिक्षण पूर्ण केले आहे.
लहानपणी मोठे होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्याला झोपू देत नव्हते. त्यामुळे किरणने नोकरीला रामराम ठोकला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. किरणने खचून न जाता अभ्यासाची जोरदार तयारी सुरु ठेवली. २०२१ साली घेण्यात आलेल्या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाला असून त्याची पोलिस उपअधीक्षक पदावर निवड झाली आहे.
मला चार वेळेस यश मिळवून हि गुणवत्ता यादीत नंबर आला नाही. मात्र हताश व निराश न होता अभ्यास सुरूच ठेवला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जावू नये, पुन्हा प्रयत्न करीत राहावे, असेही त्याने म्हटले आहे.