Satara News ! दंगलीत एकाचा मृत्यू तर दोनशेहून अधिक जमावार गुन्हा दाखल..!

Satara News सातारा : साताऱ्यात सोशल मीडियावर महापुरुषांचा अपमान केल्यामुळे तसेच वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे दंगल भडकली. संतप्त जमावाने येथील प्रार्थना स्थळावर हल्ला करुन हल्यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील एका जखमीच्या फिर्यादीवरून पोलिसात जवळपास 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोपर्यंत दंगलीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संशयीतांना अटक होत नाही .तोपर्यंत यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला दफन न करण्याचा पवित्रा त्या ठिकाणी जमलेल्यांनी घेतला होता. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.
काल रात्री जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये सहा दुचाकी, एक चार चाकी त्याचबरोबर अनेक घरे, दुकानांची तोडफोड जमावाकडून करण्यात आली आहे. दुचाकी चारचाकी जाळण्याचा प्रयत्न देखील जमावाकडून झाला आहे.
यामुळे सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काल मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आली आहे. पुसेसावळीसह परिसरात जमावबंदीचे देखील आदेश लागू करण्यात आले आहेत. पुन्हा या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलासह जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला
आहे.