खेवलकर प्रकरण ; चाकणकरांच्या गौप्यस्फोटावर खडसेंचा संताप, म्हणाले…..


पुणे : पुण्यातील खराडी येथे झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत असलेले प्रांजल खेवलकर यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले. खेवलकरांच्या मोबाइलमध्ये मुलींचे 1779 अश्लील व्हिडीओ आणि फोटो असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.या गौप्यस्फोटावर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खेवलकर यांचा तपास पोलिसांऐवजी चाकणकर करत असल्याचा टोला लगावला आहे.

मोबाईलमधील कथित अश्लील फोटो-व्हिडीओबाबत बोलताना खडसे म्हणाले, अशा गोष्टींची खात्री पोलीसांनी द्यावी, रूपाली चाकणकरांनी नव्हे. त्यांना हे कसं माहित पडलं? गुन्हा दाखल झाल्याशिवाय कुणालाही यावर बोलण्याचा अधिकार नाही. प्रांजल खेवलकर यांचे वैयक्तिक जीवन आहे. यावर बेछूटपणे बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही. काही सांगायचं असेल तर रितसर तक्रार द्या. माझा जावई असो किंवा इतर कुणी, दोषी आढळल्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण बदनामी करण्याचे काम विरोधकांनी करू नये, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच मी जावयाचं समर्थन करणारा नाही. मात्र, ही चौकशी एसआयटीने कशी करावी? ही चौकशी सीबीआयने करावी. तसेच पोलिसांनी स्पष्ट करावं की तक्रार ही संबंधित महिलेकडून आहे की इतर कुणाकडून आहे, असे खडसे यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!