khed : अंगावर वीज पडली अन् क्षणात सगळं संपलं, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, खेड तालुक्यातील घटना…

khed : आळंदीलगत चऱ्होली खुर्द (ता. खेड) हद्दीतील वडगाव – आळंदी रस्त्यावरील ठाकरवाडी येथे अंगावर वीज पडून आदिवासी कुटूंबातील एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली आहे.
ओंकार ठाकर असं मरण पावलेल्या तरुणाच नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, आळंदी परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले. मात्र पावसाच्या तुलनेत विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात होता. दरम्यान कामावरून दुचाकीने घरी येत असताना ओंकारच्या अंगावर वीज कोसळली. khed
यामध्ये ओंकारच्या शरीराला इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. वीज पडून जीवितहानी होण्याची ही दोन दिवसात खेड तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह आळंदी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, ओंकारच्या घरची परिस्थिती हलाखीची असून कष्ट करून उदरनिर्वाह केला जात आहे.त्यामुळे शासनाने ओंकारच्या कुटूंबाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.