खरातला पुन्हा न्यायालयीन कोठडी; उद्या कोर्टात हजर करण्याचे आदेश, आजच्या सुनावणीत काय घडलं?


पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने खरातला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तसेच आरोपी खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करा असे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत. आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केले जाणार आहे. त्यामुळे खरातचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक खरातला नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल केल्यानंतर लगेचच त्याचा ताबा एसआयटी घेणार आहे. खरातच्या पुढील गुन्ह्याचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार आहे. तसेच त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश नाशिक सत्र न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, आजच्या सुनावणीनंतर सरकारी वकील शैलेंद्र बागडे म्हणाले की, संशयित आरोपी अशोक खरातविरुद्ध हा दुसरा गुन्हा होता. याप्रकरणी आज त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याचा अर्ज मंजूर केला असून, उद्या पुन्हा खरातला न्यायालयात हजर केले जाईल, असे त्यांनी म्हटले.

गेल्या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अशोक खरातला आज न्यायालयात हजर केले. मागील सुनावणी प्रमाणेच सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता पुन्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आजच्या सुनावणीत खरातला तुझं नाव काय? या प्रकरणाचा पुढचा ताबा कोण घेणार? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले.आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केले जाणार आहे. तिथून पुन्हा आरोपीचा ताबा SIT घेणारआहे. त्यामुळे या प्रकरणात खरातच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!