ट्रान्सझेंडर प्रयोग ठरला यशस्वी ! केरळच्या जहाद पुरुष बनला आई !


कोजिकोड : केरळच्या त्या ट्रान्सजेंडर जोडप्याचे आई – वडील होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. जहाद या ट्रान्सजेंडर पुरुषाने आज सकाळी बाळाला जन्म दिला आहे. पण त्यांनी अद्याप बाळाचे लिंग मात्र जाहीर केलेले नाही.

या ट्रान्सजेंडर जोडप्याने नुकतेच ते आई वडील होणार असल्याचे घोषणा केली होती. “सकाळी 9.30 च्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सिझेरियनद्वारे बाळाचा जन्म झाला,” असे ट्रान्स जोडप्यापैकी एक झिया पावल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. बाळ आणि बाळाला जन्म देणारा तिचा जोडीदार जहाद दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे झियाने पुढे सांगितले.

भारतात ट्रान्सजेंडर व्यक्तीची गर्भधारणेची ही पहिलीच घटना आहे. हे जोडपे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते आणि त्यांचे लिंग बदलण्यासाठी हार्मोन थेरपी घेत होते. जहाद पुरुष बनणार असला तरी मूल होण्याच्या इच्छेने त्याने ही प्रक्रिया थांबवली होती.

झिया पावलने अलीकडेच इंस्टाग्रामवर जहाद आठ महिन्यांची गरोदर असल्याचे जाहीर केले होते. पोस्टमध्ये म्हटले होते की, “आम्ही माझे आई होण्याचे आणि त्याचे वडील बनण्याचे स्वप्न साकार करणार आहोत. आठ महिन्यांचा गर्भ आता (जहादच्या) पोटात आहे. आम्हाला जे कळले त्यावरून भारतातील ट्रान्स मॅनची ही पहिलीच गर्भधारणा आहे…”

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!