Kerala Blast : साखळी स्फोटाने केरळ हादरले! संपूर्ण राज्यात हायअलर्ट, एकाने स्वीकारली बॉम्बस्फोटाची जबाबदारी.

Kerala Blast : केरळमधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज (ता. २९) सकाळी भीषण स्फोट झाला. एकापाठोपाठ झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. Kerala Blast
स्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी एकापाठोपाठ तीन बॉम्बस्फोटांनी केरळ हादरले आहे.
तसेच त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा येथील एकाने पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. त्याने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्याचा या स्फोटाशी संबंध असल्याचा पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी बॉम्बस्फोटाच्या चौकशीदरम्यान उद्या ( दि. ३०) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
त्रिशूरतील एकाने केले पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण…
केरळचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) एमआर अजित कुमार म्हणाले की, “थ्रिसूर ग्रामीणमधील कोडकरा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने आत्मसमर्पण केले आहे. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा दावा केला आहे.
त्याचे नाव डॉमिनिक आहे. मार्टिन आणि तो असा दावा करतो की तो सभेच्या एकाच गटाचा होता. आम्ही त्याची पडताळणी करत आहोत. आम्ही या प्रकरणाच्या सर्व बाबींचा शोध घेत आहोत. हा बॉम्बस्फोट हॉलच्या मध्यवर्ती भागात झाला.
केरळमधून कर्नाटकात जाणारी सर्व वाहने तपासली जाणार..
सूत्रांनी सांगितले की, कर्नाटक अधिकारी कर्नाटक-केरळ सीमेवरील सर्व प्रवेश बिंदूंवर केरळमधून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. केरळमधून कर्नाटकमध्ये जाण्यासाठीच्या सर्व १४ ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात केले जातील, तर तैनात कर्मचार्यांची संख्या गतिमान आणि गुप्तचर माहितीवर आधारित असेल, असे सूत्रांनी सांगितले.
५२ जखमी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल..
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटात ५२ जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गंभीर जखमी झालेल्या सहा जणांमध्ये एक १२ वर्षांचा मुलगा आहे. उर्वरित जखमी इतर खासगी रुग्णालयात आहेत. मृत्यू झालेल्या एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.