आपल्या गरजा मर्यादीत ठेवा पण मुला मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण द्या – दिलीप वळसे पाटील


पुणे : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (ता. १२) रोजी काटाळवेढा गावचे माजी सरपंच बारकुशेठ भाईक यांचे नातू डॉ. राहुल व कवठे येमाई माजी सरपंच सुजाता साहेबराव कांदळकर यांची कन्या डॉ. काजल यांच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते.

त्यावेळी त्यांनी वधू वरांस शुभाशिर्वाद देत उपस्थित जनसमुदयास संबोधित करताना म्हटले की, घर छोटे बांधा आपल्या आपल्या गरजा मर्यादित ठेवा पण आपल्या मुला मुलींना उत्तम शिक्षण द्या.

पुढे ते म्हणाले की, पूर्वी डॉक्टरच्या घरात डॉक्टर, इंजिनिअरच्या घरात इंजिनियर उद्योगपतींच्या घरात उद्योगपती जन्माला येत होते. परंतु शिक्षणाचे क्षेत्र विस्तारल्यामुळे सामान्य घरातील मुले मुली इंजिनिअर, डॉक्टर होऊ लागले आहेत. मुलींनीही अनेक क्षेत्रात प्रगती केलेली आहे.

या परिवारातील नववधू डॉ. काजल आणि वर डॉ. राहुल हे उच्चशिक्षित असूनअतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.

या शुभ प्रसंगी नव दाम्पत्याने मंगरूळ (पारगाव) येथील अनाथलयातील सर्व बालकांची भविष्यात कायमस्वरूपी मोफत वैद्यकीय उपचाराची जबाबदारी स्वीकारत एक आदर्शवत संकल्प केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!