कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस निवडणूक लढवणार..!


पुणे : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. कसबा पेठ पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी आता अनेकांनी तयारी सुरू केली आहे. आता काँग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढविली जाणार असल्याचे सांगितले आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीची तयारी शहर काँग्रेसने सुरू केली आहे. काँग्रेसचा उमेदवार कसब्यातून निवडणूक लढविणार असल्यामुळे ही निवडणूक गाजेल उमेदवारीचे तिकीट कुणाला द्यायचे, यांची काँग्रेसमध्ये एक पद्धत आहे.

इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आले आहे. लवकरच प्रदेश कमिटीकडून या नावाची घोषणा करण्यात येणार आहे, प्रदेश कमिटीकडून जी फायनल यादी येणार आणि तीच व्यक्ती निवडणूक लढवणार आहे, याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक बिनविरोध करावी, असा मतप्रवाह असला तरी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे रंगत वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!