‘मविआ’ लढविणार कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक लढविणार ; चिंचवडवर उध्दव ठाकरे गटाचा दावा …!
मुंबई : कसबा आणि चिंचवड विधानसभांची पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढविणार, हे बुधवारी स्पष्ट झाले आहे. या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही असताना मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे.
पिंपरी-चिंचवड २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मूळ शिवसेनेचे आलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी जादा मते घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने हा दावा सांगितला आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाही पाठिंबा मिळविण्यासाठी चर्चा सुरू केली आहे.
चिंचवडवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दावा
पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मंगळवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’वर गेले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. सुनील तटकरे, आ. एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. कसबा आणि चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढावी तसेच दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादीची ताकद पाहता या दोन्ही जागा राष्ट्रवादीला सोडाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. मात्र उध्दव ठाकरेंनी चिंचवडची जागा राहुल कलाटे यांच्यासाठी शिवसेनेला सोडावी, असा आग्रह धरला आहे .
दरम्यान चिंचवड मतदारसंघात २०१९ मूळ शिवसेनेचे पदाधिकारी असलेले; पण अपक्ष लढलेल्या राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी पेक्षा अधिक मते घेतल्याने शिवसेनेने या जागेवर हक्क सांगितला आहे.