मोठी बातमी ! कसबा, चिंचवड निवडणुकीची तारीख बदलली…!
मुंबई : दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा तसेच चिंचवड मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
भाजप तसेच महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच सध्या सुरु आहे.दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
सुरुवातीला 07 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत, तर 27 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान पार पडणार होते.
आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे 26 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे.
Views:
[jp_post_view]