ब्रेकिंग! कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर…!

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील भाजपच्या दोन आमदारांचे दुःखद निधन झाले. यामुळे आता या मतदार संघात पुन्हा एकदा पोट निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे.

तसेच २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले.
त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाने या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर केली आहे. यामुळे आता यामध्ये कोणते पक्ष आपले उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काहींनी आधीच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात काय होणार हे आता समोर येणार आहे. हे दोन्ही आमदार भाजपचे होते. याबाबत पक्षाचे अध्यक्ष निर्णय घेतील.