ब्रेकिंग! कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या २६ जूनला बारामतीला येणार, कारण…
बारामती : काँग्रेस नेते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बारामतीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चर्चा सुरू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच नेते बारामतीला भेट देत असतात.
बारामतीचे विकासाचे मॉडेल देशात प्रसिद्ध आहे. आता सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होणार आहे. यावेळी अनेकजण उपस्थित राहणार आहेत.
बारामतीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठी साजरी होण्यासाठी येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानसह धनगर समाज बांधवांनी मोठी तयारी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी शक्तिप्रदर्शन करणार आहे.
जयंतीच्या निमित्ताने २६ जून रोजी पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील धनगर समाज एकत्र करण्याचा आमचा प्रय़त्न आहे. याबाबत माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे नेते विश्वास देवकाते यांनी दिली आहे.